सर्वधर्मपरिषद आणि तो...


   
     १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरात एका भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला,या घटनेला ४०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने शिकागो येथे सर्वधर्म परिषद आयोजित केली होती.या ठिकाणी सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना आमंत्रण होते,नव्हते ते हिंदू धर्माच्या प्रतिनिधीला.बरीच खटाटोप करून,शिफारस पत्र घेउन स्वामी विवेकानंद या परिषदेला भगव्या वस्त्रांमध्ये पोहोचले.तेव्हा फक्त संयोजकांनीच त्यांना तेथे आपले विचार मांडण्याची परवानगी दिली.त्या संधीचं विवेकानंदांनी सोनं केलं.हिंदू धर्मासंबंधी संपूर्ण विवेचन स्वामीजींनी तेथील जनसमुदायासमोर केले.त्यांच्या ‘Brothers& sisters’ मुळे त्यांचं भाषण गाजलं ते वेगळच पण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
   
ही सर्व हिंदूंसाठी आणि मुख्य म्हणजे भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब होती.ही घटना स्वामी विवेकानंदांच्या जीवनाला कलाटणी एणारी ठरली.यासोबत आणखीही एक व्यक्ती होती की जिच्या जीवनाला या परिषदेमुळे मोठी कलाटणी मिळाली.तो एक शास्त्रज्ञ होता.संपूर्ण विज्ञानसृष्टीला आणि त्यातल्या एका बलाढ्य अशा भौतिकशास्त्रज्ञाच्या संशोधनाला छेद देणारा असा,कायम दुर्लक्षित राहिलेला,तो होता निकोला टेस्ला आणि त्याने ज्या वजनदार संशोधकाला आव्हान देणारे संशोधन केले तो होता प्रख्यात थॉमस एडिसन !

    अखंड विज्ञान जगतामध्ये टेस्ला हा कदाचित असा एकमेव संशोधक असेल ज्याच्या संशोधनाने केवळ विरोध,नकार,टीका एवढेच बघितले आणि पचवले.सुरवातीचा काळ हा कष्ट करून,ज्ञान साधना करून,पोट सांभाळत जगण्यात गेला.यावेळी वैज्ञानिक जगतावर थॉमस एडिसन चे राज्य होते.विद्युत दिव्यांपासून ग्रामोफोन पर्यंत बऱ्याच गोष्टी त्याने शोधल्या होत्या त्यामुळे सर्वांच्या तोंडी एडिसनचेच नाव होते.पुढे मग एडिसनने स्वतःची जनरल इलेक्ट्रिक नावाची कंपनी सुरु केली.त्याचा व्यवसायही मग जोर धरू लागला.आणि मग सर्वसामान्यपणे जे होते तेच झाले,स्वतःच्या कामाची हवा एडिसन च्या डोक्यात शिरली आणि त्याचा अहंकारही वाढला.एडिसन च्या याच जनरल इलेक्ट्रिक या कंपनीत टेस्ला ला नोकरी मिळाली.इथे सर्व यंत्रांमध्ये काम करताना टेस्ला आपली बुद्धी वापरू लागला.या यंत्रांमध्ये एडिसनने DC प्रणाली चा वापर केला होता.DC करंटमुळे जास्त वीज खर्च होऊन त्यामध्ये उर्जा बर्याच प्रमाणात वाया जाते हे टेस्लाने ओळखलं.त्याने एडिसनशी बोलून या कार्यप्रणाली मध्ये मुलभूत स्वरूपाचे बदल केले.आणि त्याचा जनरल इलेक्ट्रिक ला फार मोठा फायदा झाला.यामध्ये फार मोठ्या रकमेचे आमिष दाखवून एडिसनने टेस्ला कडून हे काम करून घेतले होते.पण इथे एडिसन पक्का व्यावसायिक निघाला.त्याने टेस्लाला फसवले.स्वाभिमानी टेस्ला ने एडिसन ची नोकरी सोडली.पुन्हा एकदा टेस्ला रस्त्यावर आला.तेव्हा त्याची भेट जॉर्ज वेस्टिंगहाउस यांच्याशी झाली.त्यांनी टेस्ला च्या उतरत्या काळात त्याला सर्व भांडवल पुरवून हवा तो व्यवसाय आणि संशोधन करण्यासाठी मदत केली.यामुळे तो पूर्ण स्थिर झाला.व्यवसाय जोरात सुरु होता आणि सोबत त्याचं AC वीज प्रणाली वरचं संशोधनही बर्यापैकी झालं होतं.१ मे १८८८ रोजी २ पेटंट त्याच्या नावे रजिस्टर झाली होती.त्याला आता AC करंट चे महत्व पटले होते आणि आता AC हेच जगाचे भविष्य असणार आहे यावर त्याच्या मनात काहीच शंका नव्हती.एडिसनच्या DC करंट वरील व्यवस्था आणि उत्पादने कितीही चांगली असली तरी AC ची उपयुक्तता त्यापेक्षा जास्त आणि सोयीस्कर आहे हे टेस्लाने सिद्ध केले.तरीही एडिसन केवळ द्वेषबुद्धीतून अनेक डाव खेळत राहिला.त्याने टेस्ला वर आपल्या पेटंट ला धक्का लावून संशोधन केल्याचाआरोप करून कोर्टात केस केली आणि अर्थात एडिसन हरला.

     १८९३ साली शिकागो येथे अमेरिकेच्या शोधाला ४०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्वधर्मपरिषद भरवण्यात आली होती.प्रचंड मोठ मंडप,भव्य अशी बैठक व्यवस्था केली गेली होती.या परिषदेच्या विद्युत प्रकाशयोजनेचे कंत्राट  कोणाला द्यावे या संभ्रमात संयोजक होते.त्यांच्यासमोर DC प्रणाली वापरणारा एडिसन आणि AC चा उपयोग करणारा टेस्ला असे दोन पर्याय होते.यासाठी मग हजारो डॉलर्स ची बोली लावली गेली.AC प्रणाली चा वापर करून एडिसन पेक्षा अत्यल्प दरात ही योजना करून देण्यास टेस्ला तयार होता.आणि ही बोली वेस्टिंगहाउसने जिंकली.पण इथे पुन्हा एडिसनने कट केला.त्याने टेस्ला वर या विद्युत योजनेमध्ये एडिसनच्या नावे पेटंट असलेले बल्ब वापरल्याचा आरोप केला.पण वेस्टिंगहाउस आणि टेस्ला शांत राहिले.पुढच्या काही दिवसात टेस्ला ने स्वतः चे असे नवीन फ्ल्युरोसंट दिवे तयार केले.त्यांचा वापर त्याने यामध्ये केला.त्याने  या संपूर्ण प्रकाशयोजनेत AC वीज प्रणालीच्या मदतीने  विजनिर्मिती केली होती.ही जगातली पहिली विद्युत प्रकाशयोजनेवर प्रकाशमान झालेली अशी भव्य परिषद होती.यामुळे टेस्ला चे संशोधन जगासमोर आले आणि त्याने AC वीजप्रणाली ची उपयुक्तता सिद्ध केली !

Comments

  1. Wow khup chan pushkaraj. Kharach khup khup aabhiman vatatoy tuza!!! .

    Sunder aabhyaspurna lekhan
    keep it up

    ReplyDelete

Post a Comment