त्याची गोष्ट- जो पक्का राष्ट्रप्रेमी संशोधक होता- भाग १
भाग -१
"ईहा केवल बंधूत्वेर कार्य नोहे, स्वदेशेर कार्य !" रवीन्द्रनाथ म्हणाले. कारण त्यांना माहीत होतं की आपला हा खास दोस्त जे काम संपूर्ण स्वतःला झोकून देऊन केवळ स्वदेशासाठी करतोय आणि म्हणूनच आपल्या मित्राला विदेशात पैशांची गरज आहे त्याचसाठी त्यांनी ठाकुर महिमचंद्र यांना लिहिलेल्या पत्रात लिहिलय,"केवल ***बाबूर कार्ये(बाबूंच्या कार्यासाठी) आमि मान अपमान अभिमान किछुई मने स्थान दिते पारि ना !" (केवळ यांचं कार्य आहे म्हणून मी माझा मान-अपमान-स्वाभिमान याला मनात काही स्थान देत नाही आहे [म्हणूनच तुम्ही मला लाचार समजू नका किंवा तुम्हाला लुबाडतोय असं समजू नका] हे केवळ माझ्या भावाचं कार्य नाही, देशकार्य आहे !)....राष्ट्रकवी असलेले रवींद्रनाथ टागोर नक्की हे कोणाबद्दल म्हणत होते ?
कोणासाठी म्हणाले असतील ते हे वाक्य ? आपल्या मित्रासाठी, तिकडे विदेशात राष्ट्रप्रेमापुढे आणि आपल्या संशोधनापुढे समोर चालत आलेल्या लक्ष्मीलाही ठोकरतो, 'मिळालेलं हे धन स्विकारलं तर माझी राष्ट्रभक्ती आणि संशोधनावर असलेली निष्ठा कुठेतरी उणी पडली असं मला वाटेल' असं जो म्हणतो त्या आपल्या परम् मित्रासाठी रविंद्रनाथ असं म्हणाले.
शास्त्रज्ञ आणि त्यातही पदार्थविज्ञातले लोक हे जडवादी, नास्तिक, तत्वज्ञान/धर्म यांना फाट्यावर मारणारे असतात असं सहसा मानलं जातं आणि अर्थातच बरीच उदाहरणं बघितली तर हे खरं आहे, हे ही लक्षात येतं. पण याला भारतीय वैज्ञानिक हे कायमच अपवाद ठरत आले आहेत. मग ते रामानुजन(गणिती असले तरी)असोत, सर सी. व्ही. रामन असोत, सुब्रमण्यम चंद्रशेखर असोत किंवा....सर जगदीशचंद्र बोस असोत ! या आणि इतर अनेकांनी विज्ञान/गणित या विषयात भरीव असं संशोधन करताना डोक्यात भारतीय तत्वज्ञान आणि काहींनी तर भारतीय प्राचीन अशा वैदिक, औपनिषदिक तत्वज्ञान आणि अधुनिक विज्ञानातलं एकत्व सिद्ध केलं आणि ते ही आधुनिक विज्ञानाच्या कक्षेत राहून ! त्यातलच प्रामुख्याने समोर येणारं पण दुर्लक्षित राहिलेलं नाव म्हणजे सर जगदीशचंद्र बसू (इंग्रजी उच्चार-बोस, बंगाली उच्चार- बोशू).
पारतंत्र्याच्या काळात फार मोठी अवहेलना सहन करणारा भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे जगदीशचंद्र बसू. बुद्धीची फार मोठी झेप घेण्याची क्षमता असूनही कधी ते ज्या कॉलेजात शिकवत तिथल्या प्राध्यापकांकडून, कधी भारतातल्या इंग्रज सरकारकडून, तर कधी इंग्लंड मधल्या अहंकारी शास्त्रज्ञांकडून बसूंना फार मोठ्या प्रमाणात सहन करावं लागलं, पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे प्रा. क्रॉफ्ट किंवा सुप्रसिद्ध संशोधक रॅले अशी गोरी मंडळी त्यांच्यापाठी उभे राहिले म्हणून जगदीशबाबुंना आपलं संशोधन रॉयल सोसायटी समोर मांडता आलं.
आपल्याला माहीत आहे की कुठलाही सजीव जेव्हा त्याला बाहेरून सौम्य किंवा सशक्त अशी उत्तेजना दिली जाते तेव्हा तो त्यानुसार काही ना काही प्रतिसाद देतोच, मग तो माणूस असो, कोणी जनावर असो वा ती वनस्पती असो. पण हे झालं सजीवांचं पण व्हॉट अबाउट निर्जीव ? प्रतिसाद देणे हे एका अर्थी जीवंतपणाचं लक्षण झालं पण निर्जीव तर निर्जीव असतात ना, त्यांना अशा संवेदना असतील ? बसुंनी केलेला असा विचार अद्भुत होता ज्यातून भारतीय आणि जागतिक विज्ञानविश्वात मोठा बदल तर झालाच तेवढेच वादही झाले. त्यांनी एक प्रयोग केला. जेव्हा चुंबकीय ऑक्साइड च्या पृष्ठभागावर विद्युततरंग सोडला जातो तेव्हा त्यातलया रेणुंमध्ये काही बदल होतात, त्यांची वहनक्षमता वाढते.तसच जेव्हा आपण दिलेली वीज किंवा विद्युततरंग कमी करतो त्याबरोबर त्याची वहनक्षमता पूर्ववत होते. जशी वीज वाढली तशी क्षमता वाढली आणि जशी वीज कमी केली तशी क्षमताही कमी झाली. हा बदल केवळ नेहमीचाच प्रयोगातला बदल आहे म्हणून दुर्लक्ष करावं असं बसुंना नक्कीच नाही वाटलं. त्यांना होणाऱ्या ह्या परिवर्तनाचा आश्चर्यकारक असा आलेख मिळाला, मानवी किंवा इतर कोणत्याही सजीवाने उत्तेजनाला दिलेल्या कमी जास्त प्रतिसादाच्या आलेखाशी हा एका रासायनिक ऑक्साइडच्या प्रतिसादाचा मिळालेला आलेख जुळत होता. हा होता पहिला प्रयोग जो त्यांनी प्राथमिक स्वरुपात यशस्वी केला, दूसरा प्रयोग अजुनच भारी ठरला. जिवंत पेशींना आपण जेव्हा औषधाची मोठी मात्रा देऊ तेव्हा त्यांचा प्रतिसाद किंवा मिळणारा परिणामही त्याचप्रमाणात जास्त असतो आणि तसच जर आपण तो अगदी अत्यल्प दिला तर तो तसाच अत्यल्प परिणाम दिसतो. अगदी त्याचप्रकारे जेव्हा एखाद्या धातूवर जेव्हा आपण जास्त प्रमाणात प्रारणे सोडतो तेव्हा मिळणारा प्रतिसाद हा तीव्रतेच्या प्रमाणात कमी जास्त होतो. तसच काही रसायनं धातूंची संवेदनक्षमता वाढवतात तर काही असतात ती विषाप्रमाणे एकदम घटवतात.कारण यापूर्वी होणारे हे बदल इतरांनाही दिसले असतील पण केवळ ही रसायने आहेत किंवा हा धातू आहे, असं म्हणून त्यांनी सोडून दिले असेल. पण बसूंनी या गोष्टीचा एवढ्या खोलावर जाऊन केलेला उहापोह वेगळा होता. यातून मिळालेले निष्कर्ष नक्कीच चकीत करणारे होते.
पॅरिसमध्ये १९०० सालच्या ऑगस्ट महिन्यात भौतिकशास्त्रज्ञांची परिषद (इंटरनॅशनल काँग्रेस फॉर फिजिक्स) आयोजित केली गेली होती. जगदीशबाबुंनी आपलं हे संशोधन या काँग्रेसमध्ये मांडण्याचं ठरवलं. आणि अपेक्षित गोष्टी घडल्या. ते शिकवत असलेल्या महाविद्यालयाने त्यांची सुट्टी नाकारली, शिफारसपत्रही मिळेना, नोकरी सोडताही येत नव्हती कारण खुद्द केंब्रिज मधून प्राध्यापक पदासाठी आलेली संधी त्यांनी स्वदेशप्रेमासाठी नाकारली होती म्हणूनच ते भारतात राहून प्राध्यापकी करत होती. पण जिथे प्रचंड इच्छाशक्ती असते तिथे जादू घडून येते. यापूर्वीच्या त्यांच्या नावाजलेल्या संशोधनामुळे त्यांना अधिकृतरित्या भारताचा(अर्थातच भारतातल्या इंग्रज सरकारचा) प्रतिनिधी म्हणून या परिषदेला जाण्याबाबत पत्र मिळालं, जो त्यांच्यासाठी सुखद धक्का होता.आणि अशाप्रकारे पॅरिसचा मार्ग सुकर झाला.
या परिषदेला साक्षात स्वामी विवेकानंद उपस्थित होते. या ठिकाणी अचानक आपल्या बंगाली बांधवाला बघून विवेकानंदांची प्रतिक्रया काय होती, या परिषदेनंतर एक अत्यंत महत्वाची अशी अभिमानास्पद गोष्ट जगदीशचंद्रांनी केली ती कोणती ?...हे पुढील भागात !

व्वा. सुंदर.
ReplyDelete