लोकमान्यांची मांडालेतील ज्ञानसाधना
लोकमान्य टिळक हे नाव आठवलं की डोळ्यासमोर येते ती त्यांची भव्यतम अशी कारकीर्द ज्यामध्ये फार मोठ्या गोष्टी सामावल्या आहेत. त्यामध्ये मग टिळक आणि मित्रसमुहाने सुरु केलेले न्यू इंग्लिश स्कूल, केसरी-मराठा ही वृत्तपत्रे, राजकारण, स्वदेशी चळवळ इत्यादी. पण या इत्यादी मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे टिळकांवरचे तीन वेळा भरले गेलेले राजद्रोहाचे खटले. यातील दुसरा खटला हा महत्वाचा ज्यामध्ये त्यांना ६ वर्षांचा तुरुंगवास आणि हद्दपारी भोगावे लागले होते.हा दुसरा राजद्रोहाचा खटला मोठा रोमांचक ठरला, ज्याने टिळकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. केसरीमध्ये आधी चापेकरांनी लिहिलेली कविता छापली गेली हे निमित्त ठरलं आणि मग लिहिले गेलेले दोन अग्रलेख हे गुन्ह्याचे कारण ठरले. यामध्ये दादासाहेब करंदीकर, दादासाहेब खापर्डे, जोसेफ बाप्टीस्टा आणि गांधी हे टिळकांना खटल्याच्या कामी सहाय्यक म्हणून काम बघत होते. जवळपास सलग नऊ दिवस खटल्याचे का, चालले आणि २२ जुलै १९०८ च्या रात्री न्यायमूर्ती दिनशा दावर यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्...