पृथ्वीविज्ञान गाथा भाग १
भाग १
*पृथ्वीचा जन्म*
पृथ्वीचा जन्म कसा झाला या प्रश्नाचा मागोवा गेली कित्येक वर्षे जीज्ञासु घेत आहेत.अनेक धर्मग्रंथ सांगतात काही ४.५ अब्ज वर्षांपूर्वी परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली,इथपासून तेवढ्याच ४.५ अब्ज वर्षांपूर्वी एका तेजोमेघातून पृथ्वी जन्माला आली असे सिद्धांत मांडले गेले आहेत.एक मात्र आहे की पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टी आहे(अजूनपर्यंत परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध न लागल्यामुळे आपण असे म्हणू शकतो).आजपर्यंत शेकडो ग्रह शोधले गेले पण पृथ्वीसम असा कोणी आढळला नाही ज्यावर जीवसृष्टी असेल किंवा जो जीवसृष्टीला पोषक असेल.
जवळपास ४.५ अब्ज वर्षांपूर्वी एक महाप्रचंड अशा अति नवताऱ्याचा स्फोट झाला.ज्यातून मोठ्या प्रमाणात धुलीकण आणि हायड्रोजन,हेलियम,लिथियम,कार्बन यांसारखे जड वायू अवकाशात उधळल्या गेल्या.पुढे काही हजार वर्षांच्या काळात या गोष्टी एका मेघात मिसळल्या.आणि त्यामुळे त्याचे तापमान हळूहळू फार मोठ्या प्रमाणात वाढू लागले आणि तापमान जेव्हा ८ लाख फॅरेन्हाईत पर्यंत पोहोचले तेव्हा त्याचे बाह्य आवरण स्फोट होऊन त्यापासून वेगळे झाले आणि जो शिल्लक असा वायू व धुलीकणांचा प्रचंड गोळा राहिला त्याला सध्या आपण सूर्य असे म्हणतो! यातूनच भाहेर पडलेले धुलीकण,इतर अवकाशीय वस्तू,बाह्यतम पदार्थ गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र येऊ लागल्या.यातूनच आपल्या सूर्यमालेतल्या ग्रहांचे निर्माण झाले.यातच आपली पृथ्वी देखील निर्माण झाली.
निर्मितीपश्चात आपली पृथ्वी सध्या आहे तशी अजिबात नव्हती.ज्वालामुखी सारख्या उसळत्या लाव्हांचे,आगीचे तांडव हजारो वर्षे चालू होते.यामुळे असलेल्या प्रचंड बाह्यतम तापमानामुळे पाणी वगैरे असणे तर अशक्यच होते आणि पाणी नसल्यामुळे सजीवांच्या अस्तित्वाचा तर प्रश्नच नव्हता.पृथ्वीच्या स्वतःच्या गुरुत्वाकार्षणामुळे लोह,तांबे यासारखे त्या काळात असलेले जड पदार्थ पृथ्वीकेंद्राकडे आकर्षिले जाऊ लागले आणि इतर हलक्या पदार्थांचे मिळून बाह्य आवरण तयार होऊ लागले.आत्यंतिक प्रमाणात केंद्रित झालेल्या लोहामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले.सूर्याकडून येणाऱ्या बर्याचशा घातक चुंबकीय प्ररणांपासून हे चुंबकीय क्षेत्र गेली कोट्यवधी वर्षे पृथ्वीचे रक्षण करत आहे.ही प्रारणे सजीवसृष्टीला फार मोठ्या प्रमाणात घातक आहेत,हे जर थेट आपल्या पृथ्वीवर पोहोचले असते तर कदाचित आपले अस्तित्वच नसते.त्यामुळे हे चुंबकीय क्षेत्र आपल्याला वरदान ठरले आहे.
क्रमशः..
©पुष्कराज घाटगे

Comments
Post a Comment