पृथ्वीविज्ञान गाथा भाग ४
भाग ४
पृथ्वीचे अंतरंग
पूर्वी अस म्हटलं जायचं की आपण राहतो त्या जमिनीखाली पाताळ आहे,जिथे काही वेगळे लोक राहतात.असे म्हणायचे खाली नागलोक वगैरे आहे.पण शेवटी ह्या कल्पनाच आहेत.कारण आपल्या भूपृष्ठाखाली नेमके काय आहे ह्याचे सखोल म्हणतात असे ज्ञान आपल्याला गेल्या ३० ते ४० वर्षात मिळाले आहे.आपण कांद्याचे छेद घेतल्यावर जसे वेगवेगळे विभाग किंवा थर दिसतात अगदी तसेच आपल्या पृथ्वीच्या अंतर्भागात दिसतात.पृथ्वीच्या अंतर्भागाचे सामान्यतः ३ भाग पडतात.
भूपृष्ठापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरापर्यंतच्या भागाला क्रस्ट(कवच) म्हणतात.
त्यानंतर सुमारे २९०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या भागाला मॅन्टल(भूगर्भ) म्हणतात.
मॅन्टलच्या पुढील ३४०० किलोमीटर च्या भागात कोअर(गाभा) आहे.
हे सर्व मिळून पृथ्वीची त्रिज्या मिळते ६२५० किलोमिटर.
हे एकुणात तीनच भाग दिसून येतात-कवच,भूगर्भ आणि गाभा.या प्रत्येकाचे उपविभाग पडतात.पृथ्वीच्या कवचाचे पृथ्वीच्या कवचाचे दोन भाग पडतात-भूखंडीय कवच(continental crust) आणि महासागरीय कवच(oceanic crust).भूखंडीय कवच हे नावाप्रमाणेच खडकाचे बनलेले आहे.यात सिलिकॉन आणि अल्युमिनियम हे धातू सापडतात.महासागरीय कवच हे सुरवातीच्या काळात तयार झालेल्या बेसाल्ट खडकापासून बनले आहे.त्यात सिलिकॉन आणि माग्नेशियम हे धातू असतात.
त्याखालच्या मॅन्टलचेही दोन विभाग पडतात. मॅन्टल हे ‘मोहो’ नावाच्या स्तरापासून विलग झाले आहे.मोहोरोव्हीसिक या संशोधकाने ते शोधल्यामुळे त्याचे नाव देण्यात आले आहे.याचे अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल हे दोन भाग पडतात.अप्पर मॅन्टल हे ४०० ते ६०० किमी एवढे जाड आहे तर त्याखालचे लोअर मॅन्टल जवळपास २३०० किमी जाड असते. मॅन्टल मध्ये लोह आणि माग्नेशियम हे धातू आहेत.
बाह्य भूगार्भाचे म्हणजे अप्पर मॅन्टल चे आणखी दोन विभाग पडतात.सर्वात वरच्या १००किमी रुंदीच्या भागाला लिथोस्फिअर म्हणतात.त्याखाली आढळतो तो अस्थिनोस्फिअर .लिथोस्फिअर चा विभाग हा अस्थिनोस्फिअर वर जणू काही तरंगत असतो,तो एक सतत गतिमान असा भूखंड आहे.अस्थिनोस्फिअर च्या खाली मेसोस्फिअर आहे.
मॅन्टल आणि कोअर यांच्यामध्ये गुटेनबर्ग नावाचा स्तर आहे.हा कोअर म्हणजेच गाभा हा सुद्धा दोन विभागांचा आहे.बाह्यगाभा हा द्रवरूप असतो तर अंतर्गाभा घनरूप असतो.अंतर्गाभ्यात मुख्यतः लोह आणि निकेल हा धातूंचे प्रमाण अधिक आहे.या गाभ्याचे तापमान हे ५००० अंश सेल्सियस एवढे प्रचंड असते.पाण्यात जसे खोलवर गेल्यावर पाण्याचा दाब वाढतो त्याचप्रमाणे भूगर्भात खोलवर गेल्यावर दाब प्रचंड प्रमाणात वाढतो....
हे होते पृथ्वीचे अंतरंग....
क्रमशः...
©पुष्कराज घाटगे

Comments
Post a Comment