लोकमान्यांची ज्ञानसाधना
* लोकमान्यांची ज्ञानसाधना *
ज्ञानरूपी अमृतामध्ये फार मोठी ताकद असते.हे अमृत जो प्राशन करतो त्याला उभ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.भले शरीराने तो व्यक्ती कमी जगेल पण त्या जन्मात त्याने जे ज्ञान संपादित केले आहे त्या जोरावर तो जे कार्य करतो त्या नावे तो व्यक्ती पुढची शेकडो वर्षे जगतो.याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.आज ४०० वर्षांनंतरही आपण त्यांचे नाव आग्रक्रमाने घेतो.याच ज्ञानसाधनेच्या जोरावर केवळ ६४ वर्षांच्या आयुष्यात अद्वितीय असे कार्य साधले.अमर्याद ज्ञानार्जनाचा उपयोग टिळकांनी कुठे कुठे नाही केला,कोर्टामध्ये,केसरीच्या अग्रलेखांमध्ये,वाद-चर्चांमध्ये,व्याख्यानांमध्ये,ग्रंथलेखनामध्ये असा सर्वत्र आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवला.
लोकमान्यांचे यासाठीचे मुख्य साधन होते ते म्हणजे सततचे पुस्तक वाचन.लोकमान्यांचे वाचन अफाट होते.भगवद्गीता हे तर त्यांच्या जीवनाचे एक अंग झाले होते.त्याची सुरवात झाली ती वडील जेव्हा मृत्युपूर्वी अंथरुणाला खिळलेले असताना छोटे ‘बाळ’ त्यांना गीतेवरील टीकात्मक ग्रंथ वाचून दाखवत असत.यातूनच मग हळूहळू गीता ही त्यांची सवयच होऊन गेली.पुढची जवळपास ४० वर्षे गीतारहस्याचे लेखन करेपर्यंत गीता ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली होती.त्यांचे वाचनही तसेच चौफेर होते.युक्लीडीयन भूमिती,वैज्ञानिक पुस्तके यांपासून ते वेद,उपनिशदांपर्यंत असे कोणतेच वाचन त्यांना वर्ज्य नव्हते.टिळकांच्या स्वतःच्या संग्रही जवळपास १०,००० पुस्तके होती आणि अर्थातच ती सर्व पुस्तके त्यांनी वाचलेली होती.यातली बरीचशी पुस्तके टिळकांनी इंग्लंड,अमेरिका अशा परदेशांमधून खास मागवलेली होती.त्यांचे पुस्तकप्रेमही असे होते की स्वतःच्या लग्नात त्यांनी पाहुण्यांना बजावले होते की ‘मला आहेर नको आणि देणार असाल तर एखादे पुस्तक भेट द्या’ ! टिळकांचे पुस्तकांवर अतोनात प्रेम होते आंनी वाचनाखेरीज दुसरा कोणताही आनंद असू शकत नाही असे ते म्हणत. घरात आरामखुर्चीवर बसून सुपारीचे खांड तोंडात टाकत हातात पुस्तक घेउन वाचणारे लोकमान्यांचे हे चित्र रोजच्या व्यक्तींना नवीन नव्हते.याच मुद्द्यामुळे टिळक आणि विवेकानंद यांचे उत्तम जमले.वाचताना पुस्तकातील वाचलेला भाग आत्मसाद करत पुस्तक वाचण्याचा दोघांचा वेग प्रचंड होता.याबाबत दाजी नागेश आपटे यांनी एक आठवण सांगितली आहे.ते म्हणतात की ‘कोणतेही गंभीर विषयांवरचे नवीन पुस्तक आले की ते अल्पकाळात वाचून काढत असत.एकदा ‘रशियातील राज्यक्रांतीचे प्रयत्न’ या नावाचे एक सातशे-आठशे पानांचे पुस्तक त्यांनी दीड दिवसात वाचून पूर्ण केले.मला वाटले की त्यांनी उडते उडते वाचले असेल तर त्यांनी(टिळकांनी) सांगितले की “मी हे पुस्तक पूर्ण वाचले आहे”.असे म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी पुस्तक बाजूला ठेउन अमका अमका मजकूर अमुक पानावर आहे असे सांगून बघायला सांगितले आणि त्यांचे म्हणणे खरे होते.ते म्हणाले की “यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.पुष्कळ वाचन व मनन यामुळे साधारणतः कोणत्याही प्रश्नाचे ग्रंथकार अमुक तर्हेने करतो हे समजू शकते.एकदा का हे धोरण समजले की त्या विचाराच्या साखळीतील सर्वच दुवे पहावे लागत नाहीत,ते तर्काने ताडता येते आणि तर्क अनेक वेळा चालावल्यास त्यात कौशल्य येत” ’यामध्ये लोकमान्यांची उच्चतम अशी ज्ञानसाधना दिसून येते.
पहिल्या दोन राजद्रोहाच्या खटल्यांम्ध्ये बर्याच अंशी युक्तिवाद टिळकांनी स्वतः केला होता.त्यांच्यासोबत दाजी खरे,दादासाहेब खापर्डे,महम्मद आली जिना,बद्रुद्दीन तय्यबजी,बापट असे विधीज्ञ होते पण शेवटी टिळक हे टिळक होते.१९०८ सालच्या दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये टिळकांचा युक्तीवाद हा एकुणात २१ तास चालला होता.त्यामध्ये संदर्भ म्हणून टिळकांनी दिलेली कलमे ही भारतातल्या कोणत्याही पुस्तकातील नव्हती.ही कलमे सापडली ती एका ब्रिटीश पुस्तकात जे पुस्तक त्या संपूर्ण भारतात फक्त टिळकांकडेच होते जे त्यांनी इंग्लंडहून मागवले होते.याचा अर्थ जे संदर्भ खुद्द न्यायमूर्तींना माहित नव्हते त्यांचा अभ्यास त्यापूर्वीच टिळकांनी केला होता.सर्व गोष्टी सुनियोजित आणि पूर्वनियोजित असणे हीच तर त्यांची खासियत होती.याचवेळी टिळकांना ६ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली मंडाले येथे.टिळकांनी मंडाले येथे हीस्टोरियन चे ‘हिस्टरी ऑफ द वर्ल्ड ’ त्याचबरोबर, मुंबईहून महाभारताची आणि इतर पुस्तके मिळवली,कॉन्त च्या positive philosophy चे तीन खंड आणि positive polity चे चार खंड,आनंदाश्र्मातून ब्राह्मसूत्राचे दोन खंड,उपनिषदे आणि त्यांची भाषांतरे म्हैसूर येथून मागवले,संत रामदास लिखित दासबोध,तुकारामांची गाथा, अर्थातच भगवद्गीता,डार्विनिझम अॅन्ड पोलिटीक्स,रुसोचे ‘सोशल कॉन्ट्रॅक्ट,फ्रेंच भाषेतील कित्येक पुस्तके, परदेशी तत्वज्ञानाची काही पुस्तके,ऋग्वेदाचा संस्कृत-जर्मन शब्दकोश,जर्मन इंग्लिश शब्दकोश,असे कित्येक ग्रंथ मागवले. जवळपास शंभरेक पुस्तके त्यांनी मंडालमध्येच वाचली असतील.टिळकांनी एक महत्वाचे काम येथे केले.जर्मन-इंग्लिश,संस्कृत-जर्मन असे शब्दकोश मागवून त्यांनी जर्मन आणि नंतर फ्रेंच या भाषांचा तौलनिक अभ्यास केला आणि या भाषा शिकून घेतल्या.आणि त्यावरून ऋग्वेद आदी ग्रंथांचे त्या भाषांमध्ये बनलेले टीकात्मक ग्रंथ आणि भाषांतरित ग्रंथ यांचे वाचन केले.१९१३ सालच्या पत्रातून त्यांनी श्रुडरचे बुद्धीजम अॅन्ड ख्रीस्टेन्डम हे जर्मन पुस्तक मागवले,याचा अर्थ तोपर्यंत टिळक जर्मन भाषा पूर्ण शिकले होते स्वतःच्या जोरावर आणि प्रतिभासाधनेवर.टिळकांनी मागवलेल्या पुस्तकांची यादी द्यावी तेवढी लांबत जाईल एवढी पुस्तके त्यांनी मांडले मध्ये मागवून वाचली.त्यांच्या वयाकडे बघून सक्त मजुरीची शिक्षा कमी केल्यामुळे त्यांना या वाचनाला वेळ मिळत होता .मंडालेमध्ये राहून ते भारतात धोंडोपंतांना घरी असलेल्या पुस्तकांची काळजी घेण्यास सांगत.
टिळकांविषयी प्रबोधनकार ठाकरे यांनी एक आठवण सांगितली आहे.चित्रशाळा प्रेस मध्ये प्रबोधनकारांनी लिहिलेले वक्तृत्वशास्त्र हे पुस्तक छापले जात होते.नेहमीप्रमाणे वासुकाका जोशी पत्रे वाचत बसले होते.शेजारी एक वृद्ध गृहस्थ काही कागद वाचत होते.वासुकाका जोशी यांनी प्रबोधनकार आणि त्या वृद्ध गृहस्थाची म्हणजे टिळकांची ओळख करून दिली.तेव्हा टिळकांनी विचारले ‘वकृत्वशास्त्र तुम्ही लिहिले आहे ?’ असे म्हणून पुस्तकाचे कौतुक केले.तेव्हा प्रबोधनकार म्हणाले की अजून हे पुस्तक छापून बाहेर पडायचे आहे.तेव्हा टिळक म्हणाले की ‘मी त्याची प्रुफे वाचली.जवळपास सर्व प्रकरणे वाचून झाली आहेत.मला पुस्तक फार आवडले.पुस्तक प्रकाशित झाल्यावर याचा अभिप्राय मीच लिहिणार !’...ही होती टिळकांची ज्ञानलालसा...
प्रत्येक गोष्टीत नाविन्य,सर्जनशीलता हा तर त्यांचा प्रमुख गुण होता.ओरायन,आर्क्टिक होम इन द वेदाज आणि अर्थात गीतारहस्य ही पुस्तके म्हणजे तर त्यांच्या अखंड ज्ञानसाधनेचा उत्तुंग आविष्कारच म्हटले पाहिजे.भले याठिकाणी काही तर्क चुकले असतील पण अभ्यास कुठेच कमी पडला नव्हता.टिळकांविषयी त्यांच्या जावयाने वि.ग.केतकर यांनी एक विनोदी प्रसंग सांगितला आहे.टिळक एकदा म्हणाले की तुरुंगात आर्क्टिक होम इन वेदाज चा विचार ते करत होते.त्यावेळी एके रात्री त्यांना ऋग्वेदातील एका ऋचेचा अर्थ लागला तेंव्हा तुरुंगात असताना माझी ती रात्र आनंदात गेली. ते मित्र म्हणाले ‘ तुरुंगात कसला आलाय आनंद?’ तेंव्हा टिळक उत्तरले ‘ तो आनंद तुम्हाला तुरुंगात गेल्याशिवाय कळणार नाही !’..
पुष्कराज घाटगे

Comments
Post a Comment