पृथ्वी'विज्ञान गाथा भाग २
भाग २
यानंतरच्या काही शेकडो वर्षांच्या कालखंडात जवळपास मंगळाच्या आकाराचा एक प्रचंड धुमकेतू पृथ्वीवर आदळला.या धुमकेतू चा बराचसा भाग हा पृथ्वीशी सलग्न झाला आणि त्याचबरोबर यातून पृथ्वीचा एक मोठा भाग हा मुळ ग्रहापासून विलग झाला.हा विलग झालेला भाग पुढच्या काहीशे वर्षांमध्ये पृथ्वीचा उपग्रह म्हणून अर्थात आजच्या भाषेत चंद्र म्हणून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागला.हाच चंद्राचा जन्मकाळ ठरला.
चंद्राच्या निर्मितीमुळे आणि धुमकेतुशी आलेल्या संपर्कामुळे पृथ्वीचे वातावरण पूर्णतः ढवळून निघाले.सर्व गोष्टी मुळापासून बदलून गेल्या.चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्वतः स्थिर झाली.निर्मिती नंतरच्या हजारो वर्षांच्या काळात पृथ्वीचा स्वतः भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा काळ म्हणजेच पृथ्वीचा एक दिवस हा केवळ ८ तासांचा होता,पृथ्वीची ही गती कमी होत होत तीचा आवर्तनकाळ हा २४ तासांवर आला.सतत हजारो वर्षे आगीचे,धगीचे घर झालेली पृथ्वी थंड होऊ लागली.हा काळ अनेक वायूंचा,मूलद्रव्यांचा जन्मकाळ होता.ज्वालामुखी मधून उसळणारा लाव्हा रस सर्वत्र पसरला आणि त्याच्या परिणामाने पृथ्वीचा पृष्ठभाग थंड टणक होण्यास सुरवात झाली,यातून जो खडक तयार झाला तोच ‘बेसाल्ट’ खडक!
ज्वालामुखी मधून बाहेर पडणाऱ्या या वाफा,कार्बनडायओक्साइड,नायट्रोजन यांच्या संयोगातून,नैसर्गिक प्रक्रियांमधून इतर वायूंची निर्मिती झाली.यातूनच ढगांची निर्मीती संभवली.ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या आणूंनी एकत्र येउन पाणी निर्माण केले जे ह्या ढगावाटे पावसाच्या रूपाने भूपृष्ठावर बरसले.पुढची कित्येक वर्षे अशा जलवर्षावामुळे पृथ्वी थंड झालीच पण त्याचबरोबर जलमय झाली हे महत्वाचे.
हायड्रोजन,ऑक्सिजन ही मंडळी येऊन त्यांनी पाण्याची निर्मिती केली.कार्बन,कार्बनडाय ऑक्साइड,ऑक्सिजन,हायड्रोजन,या मंडळींनी एकत्र येउन अमिनो अॅसिड्स ची निर्मिती केली.या अमिनो अॅसिड्समुळे सजीव निर्मितीसाठी वातावरण पोषक तयार होऊ लागले.पुढे भलेही कित्येक वर्षांचा काळ गेला पण त्यानंतर याच काळात पृथ्वीवर महासागरांमध्ये एकपेशीय सजीवांचा जन्म झाला!
क्रमशः...
©पुष्कराज घाटगे

Comments
Post a Comment