पृथ्वीविज्ञान गाथा भाग ५
भाग ५
यापूर्वीच्या भागामध्ये पृथ्वीच्या पोटात काय दडले आहे ते बघितले,आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पर्वत,पठार हे कसे तयार झाले ते पाहू.
आपल्याकडील सह्याद्रीच्या भागाचे एक फार मोठे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी बहुतांश भाग हा पर्वत,पठारांनी व्यापलेला आहे.यांचाच उपयोग करून शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा चालाखीने वापर केला.पण या विरुद्ध बाजू आहे ती उत्तरेकडची.तेथील बहुतांश भाग हा सपाट भूप्रदेशाने व्यापला आहे.डोंगरदऱ्या नावालाही दिसत नाहीत.याचाच तोटा पानिपत च्या युद्धात मराठ्यांना झाला कारण पर्वतप्राय प्रदेशाच्या अभावामुळे गनिमी काव्याने युद्ध खेळणे शक्यच नव्हते.हे पर्वत नसते तर सलग सपाट असा भूप्रदेश बघण्याचा आपल्याला कंटाळा आला असता.निसर्गचित्र काढताना त्रिकोणी आकाराचे डोंगर,त्यामागे छोटासा सूर्य,वगैरे काढण्याची कल्पनाही आपल्याला शिवली नसती जर हे पर्वत आपल्या आजूबाजूला नसते तर.परंतु सुदैवाने काही थोडा प्रदेश सोडला तर भूपृष्ठाचे फार मोठे क्षेत्र डोंगरदऱ्यानी व्यापले आहे.
आपण इथे आपल्या समोर मोठमोठे डोंगर बघतो पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सर्वात मोठी पर्वत शृंखला सागर तळाशी आढळून येते.ती सरळ सरळ आपल्या नजरेत येत नाही.भूपृष्ठावरील सर्वात लांब पसरलेली अॅन्डीज पर्वतरांगेची लांब ६४३७ किमी आहे तर मध्य महासागरातील पर्वतशृंखला ‘मिड ओशन रिज’ ही साऱ्या जगाला वळसा घालते,तिची लांबी तब्बल ६४,००० किमी आहे!आपल्याकडे माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून ते समुद्रसपाटीपासून ८८४८ मी उंच आहे.
पृथ्वीचे कवच हे अनेक भूखंडामध्ये विभागले गेले आहे.या भूखंडाची सतत हालचाल चालू असते.जेव्हा एखाद्या ठिकाणी दोन भूखंडांची टक्कर होते तेव्हा पृथ्वीच्या भूखंडाला घड्या पडतात.या भूखंडाच्या घड्या कवचावर आल्या की त्यांना पर्वताचे स्वरूप प्राप्त होते.काही कोटी वर्षांपूर्वी भारतीय भूखंडाचे स्वतंत्र अस्तित्व होते,त्यावेळी त्याने युरेशियन भूखंडाला टक्कर दिली आणि या युरेशियन भूखंडाला प्रचंड घड्या पडल्या.त्यांना आपण आजच्या काळात हिमालय म्हणून ओळखतो.अशांना ‘फोल्ड माउंटन्स’ म्हणतात.
तशीच दुसरी बाजू म्हणजे जेव्हा एक भूखंड दुसऱ्याला सतत धक्के देत राहतो,त्यावर कुरघोडी करतो,त्यावेळी एका बाजूचा भूभाग वर उचलला जातो आणि पर्वतरांगा तयार होतात.यांना ‘फॉल्ट ब्लॉक माउंटन्स’ म्हणतात.
ज्वालामुखी हा सुद्धा पर्वताचा एक प्रकार आहे.ज्वालामुखीद्वारे भूगर्भातील वितळलेले खडक बाहेर उसळतात.अनेकवेळा उफाळणाऱ्या ज्वालामुखीतून लाव्हारस,राख आणि खडक बाहेर पडून त्यांचा एकावर एक थर साचत गेला की ज्वालामुखी पर्वत तयार होतो.सागर तळाशी असणाऱ्या ज्वालामुखी पर्वातांपासून बेटांचा जन्म होतो.काहीवेळा भूगर्भातील खडक बाहेर न पडता आतच जमा होतात आणि त्यांचा आकार वाढत गेला की भूपृष्ठाला फुगवटा येतो.या फुगवट्याची धूप झाली की उरलेला अग्निजन्य खडकांचा डोंगर बनतो.अशा पर्वतांना ‘डोम’ किंवा ‘बाथोलीथिक’ म्हणतात.
या पर्वत तयार होण्याच्या प्रक्रियेला हजारो वर्षांचा कालखंड लागतो,या प्रक्रियेला आंग्ल भाषेत ‘ओरोजेनेसीस’ म्हणतात.
क्रमशः
पुष्कराज घाटगे

Comments
Post a Comment