पृथ्वीविज्ञान गाथा भाग ९



भाग ९
पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण-
सुरवातीच्या दोन भागांमध्ये पृथ्वीच्या जन्मासाठी आणि नंतर चंद्राचा जन्मानंतर पृथ्वीसाठी गुरुत्वाकर्षणाचा कसा परिणाम झाला ते समजले.पृथ्वीचा जन्म आणि मृत्यू या दोन्हीसाठी गुरुत्वाकर्षण फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते.

पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सर्व दिशांना किंवा सर्व ठिकाणी सारखे नाही.कुठे ना कुठे कमी-जास्त प्रमाणात करत असते.कचंद्राच्या निर्मितीनंतर धगधगती पृथ्वी थंड होऊ लागली आणि काही सहस्त्र वर्षांमध्ये ती पूर्ण स्थिर झाली.पूर्वी फक्त पृथ्वीचे स्वतःचे आणि थेट सूर्याचे गुरुत्वाकर्षण यांच्या परिणामामुळे तिचा परिवलन आणि परिभ्रमणाचा वेग प्रचंड होता.स्वतः भोवती एक फेरी केवळ आठ तासात पूर्ण करत असे.पण चंद्राच्या जन्मानंतर पृथ्वीचा बराचसा भाग तिच्यापासून विलग झाला.त्या भागाचा,म्हणजे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा आणि त्याउपर सूर्याच्या सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम असा झाला की पृथ्वीची गती मंदावली.स्वतः भोवती फिरण्याचा तिचा वेग ८ तासांवरून २४ तासांवर आला.चंद्राचे गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण यांमध्ये समतोल साधला गेला आणि चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती भ्रमण करू लागला.चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर सागरांना भरती-ओहोटी आणते.पृथ्वीवर सर्वत्र वस्तुमान सारखे नाही,ते सतत बदलत असते.त्यामुळे गुरुत्वीय केंद्रात बदल होत राहतो.
पृथ्वीचे परिवलन,स्थिर-अस्थिर वस्तू,चंद्राचे आकर्षण,पर्वत,उपग्रह अशा गोष्टींचा खुद्द गुरुत्वाकर्षणावर परिणाम होत असतो.पृथ्वीच्या आकाराबाबत यापूर्वी आलेल्या माहितीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वत्र केंद्रोत्सारी बल(centrifulgal force) कार्यरत असते.विषुववृत्तावर केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेत असते.त्यामुळे इतर पृष्ठ्भागापेक्षा तुलेने अत्यंत न्यूनतम असे गुरुत्वाकर्षण विषुववृत्तावर असते.
न्यूटनरावांनी सांगितल्याप्रमाणे गुरुत्वीय बल केंद्रापासून असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते.यातून स्पष्ट होते की भूपृष्ठापासून जसजसे वर जाऊ तसे गुरुत्वाकर्षणाचा जोर कमी कमी होत जातो.उंच पर्वत-शिखरांवर गेल्यावर आपल्याला हे सहज जाणवते.तशाच प्रकारे बरोब्बर विरुद्ध नियम असा की,भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जसे जसे खाली जाऊ तसा गुरुत्वाकर्षणाचा जोर कमी होतो.
पृथ्वीच्या कवचाच्या असमान आकारामुळे गुरुत्वाकर्षणावर फरक दिसून येतो.पृथ्वीवर ज्या ठिकाणी वस्तू जास्त प्रमाणात एकवटलेल्या असतात तेथे गुरुत्वाकर्षण जास्त असते.हिमालय,आल्प्स,अॅन्डीज,रॉकी या पर्वतांमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तुमान एकवटलेले असल्यामुळे तेथे गुरुत्वाकर्षण जास्त दिसून येते.त्यामुळे ज्यावेळी विमानापासून ते अगदी कृत्रिम उपग्रहापर्यंत जे या पर्वतांवरून जातात तेव्हा त्यांच्या गतीमध्ये गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे बदल घडतो.
पृथ्वीवर असणाऱ्या गुरुत्वीय बलाचे मोजमाप घेण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीणे २००९ साली ‘ग्रॅव्हिटी फिल्ड अॅन्ड स्टेडी ओशन सर्क्युलेशन एक्स्प्लोरर’(GOCE) हा उपग्रह प्रक्षेपिला.या उपग्रहाने भूपृष्ठापासून जवळपास २५० किलमी अंतरावरून अंदाज घेउन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा एक अचूक नकाशा रेखाटला.या नकाशाला ‘जीऑइड’ म्हणतात.हा नकाशा पृष्ठावर असलेली गुरुत्वाकर्षणाची उच्चनीचता दर्शवतो(हा ‘जीऑइड नकाशा खाली रंगीत चित्रात दर्शविला आहे).
क्रमशः
पुष्कराज घाटगे

Comments