पृथ्वीविज्ञान गाथा भाग ६


गुरुपोर्णिमेनिमित्त पृथ्वीचा निकटवर्तीय अशा गुरु ग्रहाची माहिती घेऊ आणि पुढच्या भागात पुन्हा पृथ्वीकडे वळू...
गुरू ग्रह प्राचीन काळापासून मानवाला ज्ञात आहे. रात्री हा ग्रह दूर्बिणिविना दिसू शकतो तर काही वेळा दिवसासुद्धा सूर्य अंधूक असला तर गुरू दिसतो.बाबिलोनियन संस्कृतीमध्ये गुरू हा त्यांचा देव मार्दुक याचे प्रतिक मानला जात असे. तसेच गुरूच्या जवळपास १२ वर्षाच्या परिवलन काळाचा उपयोग त्यांच्या राशींशी निगडित नक्षत्रे ठरविण्यासाठी केला जात असे.
रोमन संस्कृतीमध्ये ज्युपिटर देवाच्या नावावरून गुरूला ज्युपिटर हे नाव दिले गेले होते. जोव या नावानेसुद्धा ओळखला जाणारा हा देव रोमन संस्कृतीतील मुख्य देव होता. गुरूचे खगोलशास्त्रीय चिन्ह , ज्युपिटरच्या हातातील वज्रास्त्र (विजेसारखे दिसणारे अस्त्र, भारतीय संस्कृतीमध्ये इंद्राजवळ वज्रास्त्र होते.) दर्शविते. ग्रीक देवता झ्यूस सुद्धा गुरूशी संबंधित आहे. गुरूसाठी वापरण्यात येणारे झिनो हे विशेषण झ्यूसवरून आले आहे.
चिनी, जपानी, कोरियन व व्हियेतनामी संस्कृतीमध्ये गुरूला लाकडांचा तारा (wood star) म्हटले जाते.[३७] जो चिनी संस्कृतीतील पाच मूलतत्वांशी संबंधित आहे. ग्रीक त्याला फेथॉन म्हणत, ज्याचा अर्थ 'दीप्तीमान' (blazing) असा होतो. इंग्रजीतील 'थर्स डे' (Thursday) हे नाव जर्मॅनिक दंतकथेतील थोरवरून आले आहे, जो गुरूशी संबंधित आहे.
१६१० मध्ये गॅलिलियोने दुर्बिणीद्वारे आयो, युरोपा, गनिमिड व कॅलिस्टो या गुरूच्या चार नैसर्गिक उपग्रहांचा(चंद्रांचा)शोध लावला. गुरूच्या या चंद्रांना आता गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. पृथ्वीसोडून इतर ग्रहांच्या चंद्रांचे हे पहिले निरीक्षण मानले जाते. मात्र, चिनी खगोलशास्त्राचा इतिहासकार झी झेझोंग याच्या मते, गॅलिलियोच्या आधी दोन हजार वर्षांपूर्वीच गुरूच्या एका चंद्राचा शोध चिनी खगोलशास्त्रज्ञ गान डे याने इसवी सन पूर्व ३६२मध्ये दुर्बिणीविना लावला होता.
गॅलिलियोचा शोध आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे अवकाशातील सर्व वस्तू फक्त पृथ्वीभोवतीच फिरत नाहीत असे सिद्ध झाले. या शोधामुळे कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला दुजोरा मिळाला. या सिद्धान्ताप्रमाणे ग्रह पृथ्वीभोवती फिरत नसून सूर्याभोवती फिरतात असे त्याने मांडले होते. गॅलिलियोचा कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला असलेल्या उघड पाठिंब्यामुळे तो संकटात सापडला होता.
इ.स. १६६० मध्ये कॅसिनीने नवीन दुर्बिणीच्या साहाय्याने गुरूवरील डाग व रंगीत पट्टे पाहिले. त्याला असेसुद्धा आढळले की गुरू हा ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे. कॅसिनी त्याच्या निरीक्षणांवरून गुरूचा परिभ्रमण काळ काढू शकला.१६९० मध्ये कॅसिनीला आढळले की गुरूच्या वातावरणाचा परिभ्रमणाचा वेग गुरूच्या वेगापेक्षा वेगळा आहे.
१८९२ मध्ये इ. इ. बर्नार्ड याने कॅलिफोर्निया येथील लिक वेधशाळेत गुरूचा पाचवा चंद्र शोधून काढला. हा छोटा उपग्रह शोधून काढल्यामुळे त्याच्या वेधक नजरेचे कौतुक झाले व तो प्रसिद्ध झाला. या चंद्राला नंतर अमाल्थिआ हे नाव देण्यात आले.प्रत्यक्ष बघून शोधण्यात आलेला हा शेवटचा उपग्रह आहे.यानंतर व १९७९ मधील व्हॉयेजर १ मोहिमेपूर्वी गुरूचे अजून आठ उपग्रह शोधण्यात आले होते.
गुरूभोवती एक धूसर कडे आहे. त्याचे तीन हिस्से आहेत. आतील हिस्सा हॅलो (halo) नावाचा धुलिकणांचा आहे. त्यानंतरचे मुख्य तेजस्वी कडे व सर्वांत बाहेरचे "गॉसॅमर" नावाचे कडे.हे कडे धुलिकणांनी बनलेले आहेत, तर शनीचे कडे बर्फाचे आहे.मुख्य कडे बहुधा अद्रास्तिआ व मेटिस या उपग्रहांपासून उत्सर्जित झालेल्या धुळीपासून बनले आहे. उपग्रहावर वापस पडणारे हे धुलिकण व लहान लहान खडक, बहुतकरून, गुरूच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवती फिरू लागतात.याचप्रकारे, थेबे आणि अमाल्थिआ हे उपग्रह गॉसॅमर कड्याचे दोन भिन्न भाग बनविण्यास कारणीभूत आहेत.
अशी ही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला...
काही सुचना असतील तर नक्की सांगा...
©पुष्कराज घाटगे

Comments