पृथ्वीविज्ञान गाथा भाग ३
भाग ३
पृथ्वीचा आकार
पृथ्वीचा आकार
आधीच्या भागांमध्ये दिली होती ती पृथ्वीच्या आणि पुढे सजीवांच्या निर्मितीची कथा.आता पृथ्वीची वास्तविक अशी सविस्तर माहिती घेऊ.
सुरवात करू पृथ्वीचा आकार कसा आहे त्यापासून.आपल्याला बर्याचदा वाटते की पृथ्वी ही गोल आहे,जि समजूत पूर्णतः चुकीची आहे.पृथ्वी ही २४ तासात एक परिवलन पूर्ण करते.यामुळेच पृथ्वीवर केंद्रोत्सारी बल(centrifugal force) कार्य करत असते.केंद्रोत्सारी बल म्हणजे जे बल वक्राकार किंवा गोलाकार फिरणाऱ्या वस्तूला मार्गापासून किंवा केंद्रापासून अलग करतो.या केंद्रोत्सारी बलामुळे विषुववृत्ताच्या दिशेत पृथ्वीला फुगवटा आला आहे.पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याच्या अक्षास काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असलेले असे एक मोठे (काल्पनिक)वर्तुळ म्हणजे विषुववृत्त.(विषुववृत्त व इतर संदर्भात पुढे माहिती मिळेलच).
केंद्रोत्सारी बलाचाच परिणाम म्हणून सध्याची पृथ्वी ही गोलाकार नसून घन दीर्घवर्तुळाकार आहे.याचाच अर्थ असा की पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास हा ध्रुवीय व्यासापेक्षा थोडा जास्त आहे.विषुववृत्तावर पृथ्वीचा छेद हा वर्तुळाकृती आहे पण दोन ध्रुवांमधून घेतलेला छेद हा दीर्घवर्तुळाकृती विषुववृत्तावर गुरुत्वाकर्षाणाचे बल हे केंद्राच्या दिशेने तर केंद्रोत्सारी बल हे केंद्राच्या विरुद्ध दिशेला कार्य करते.
यातून एवढे तरी स्पष्ट होते की पृथ्वी एकीकडे थोडी वर्तुळाकृती,कुठे दीर्घवर्तुळाकृती,तर कुठे थोडी चपटी दिसून येते.
क्रमशः...
©पुष्कराज घाटगे

Comments
Post a Comment