पृथ्वीविज्ञान गाथा भाग ७

भाग ७
  
 स्वतंत्र भूखंडांचे अस्तित्व-
    पृथ्वीवर सध्या आशिया,आफ्रिका,युरोप,उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,ऑस्टेलिया,अंटार्टिका,असे ७ खंड आहेत.हे खंड कसे निर्माण झाले,प्रत्येक खंडात मानवाचे अस्तित्व कसे ,अशाप्रकारचे प्रश्न आपल्याला फार पूर्वीपासून पडत आहेत.
    
     पृथ्वीचे सरकते भूखंड याविषयी अनेक संशोधकांनी बरेच सिद्धांत मांडले आहेत.जेम्स दाना नावाच्या एका संशोधकाने गेल्याच्या गेल्या शतकात एक सिद्धांत मांडला तो असा की ‘पृथ्वी हळू हळू थंड होताना तीच कवच टणक बनत गेले.हे होताना काही भाग इतरांपेक्षा जास्त लवकर टणक बनला आणि त्यांची आशिया,आफ्रिका,अमेरिका असे खंड बनले.’ पण मग नंतर इतरांना यावर वेगळेच प्रश्न पडू लागले,की जसा मानव आशियात दिसतो(दिसतो म्हणजे रंगावरून नाही तर शरीराच्या घडणीवरून म्हटले आहे) तसाच मानव आफ्रिका,अमेरिका या खंडातही दिसतो.तसेच प्राणी,वनस्पती यांच्या सारख्याच दोन प्रजाती,त्यांचे जीवाश्म दोन लांबच्या खंडातही आढळतात हे कसे ?
     
    काहींनी असे मांडले की ‘म्हणे’ पूर्वी या जीवांना इकडून तिकडे असा खंडप्रवास करायला ब्रिज/पूल असतील.मग जेव्हा प्रतिप्रश्न केला की सध्या हे पूल कोठे असतील तर प्रत्युत्तर असे मिळाले की पृथ्वी थंड झाल्यावर ते कोसळले असतील.या अशा प्रश्नोत्तरांच्या खेळामुळे ही थेअरीसुद्धा डब्यात गेली.
    
      १९६५ साली टूझो विल्सन विल्सन याने सुचवले की भूपृष्ठाचे हलते पट्टे,विस्तारणाऱ्या भेगा हे परस्परांशी असे बद्ध झाले आहेत की यांची जणू साखळीच तयार झाली आहे.या साखळी मुळे पृथ्वीचा पृष्ठभाग अनेक टणक भूखंडात विभागला गेला आहे.
    
     १९५० ते ६० या काळात ‘प्लेट टेक्टोनिक्स’ हा सिद्धांत पुढे आला.पृथ्वीचा पृष्ठभाग अनेक लहान मोठ्ठ्या भूखंडात विभागला गेला आहे आणि त्याचे सतत चलन वलन होत असते असा हा सिद्धांत होता.पण हा तसा साधाच सिद्धांत ठरला.
     
    क्लेरन एडवर्ड दटन याने थोडा वेगळ्या धाटणीचा सिद्धांत मांडला.त्यांनी सांगितले की ,समुद्राच्या तळाशी असणाऱ्या पृष्ठभागाखालचे खडक हे किनाऱ्यावरच्या कवचाजवळच्या खाडकांपेक्षा जास्त घन असले पाहिजेत म्हणूनच ते खाली राहिले आणि किनाऱ्याकडील जमीन वर येत गेली आणि यातून खंड निर्माण होत गेले.याला हटन याने ‘आयसोस्टेसी’ म्हटले आहे.पण यातही काही त्रुटी दिसून आल्या.यातून लक्षात आले की भूखंड वर आले पण ते आपले मुळ स्थान कसे सोडू लागले हे समजू शकले नाही.
      
    या सर्व अयस्वी थेअरीज नंतर काही प्रमुख,सविस्तर सिद्धांत पुढे आले.१६२० साली फ्रान्सिस बेकन या तत्वज्ञाने दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा आणि आफ्रिकेचा पश्चिम किनारा बघून ते एकमेकांत फिट्ट बसतात हे ओळखले होते.तेव्हा त्याने ‘हे खंड पूर्वी एकच तर नसतील? आणि नंतर ते विभागले गेले असतील’ असा विचार केला.पण त्याच्या या विचाराचा पुढे जास्त विचार केला गेला नाही.१८५८ साली अॅन्टोनिओ स्नायडर पेलोग्रिनी याने सांगितले की पृथ्वी थंड होताना सर्व जमीन एकच होती मग तिचे तुकडे झाले.
   
     मग या खेळात एकच सिद्धांत ४ जणांनी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या  वेळी मांडला.जर्मनीचा आल्फ्रेड वेनेगर.वेगेनर याने १९१२ साली असे मांडले की हे सर्व खंड पूर्वीच्या काळी एकच होते,त्या अखंड खंडाला त्याने ‘पॅन्जिया’ असे नाव दिले.ग्रीक भाषेत पॅन्जिया म्हणजे अखंड जमीन.साधारण १० कोटी वर्षांपूर्वी पॅन्जियाचे तुकडे झाले असावेत.त्यातूनच अमेरिका,युरेशिया आणि आफ्रिकेपासून वेगळा झाला असेल आणि भारताने आफ्रिकेपासून विलग होऊन आशियाला टक्कर देउन त्याचे आशियासोबत बंध जुळले असतील.
      यासोबत वेगळीकडे किंवा नंतरच्या काळात एडवर्ड बुलार्ड,जिम एव्हरिट आणि अॅलन स्मिथ यांनी एकत्रितपणे पुरातन पृथ्वीचा नकाशा साकारला.त्यात दक्षिण अमेरिका आणि पश्चिम आफ्रिका एकमेकांसोबत जुळले,उत्तर कॅनडा आणि पूर्व आशिया अगदी योग्य जुळले.हा सर्व खंडांचा एकत्रित असा नकाशा संगणकावर तयार केला गेला होता.यांनी सुद्धा याला पॅन्जिया हेच नाव दिले...
   
ही होती खंडाखंड भूमीची कथा...

©पुष्कराज घाटगे

Comments